आरोग्यासाठी कृत्रिमप्रज्ञा
डोळे, कान, नाक, जीभ, आणि त्वचा या मुख्य ज्ञानेंद्रियांमधून आपण आजूबाजूच्या जगाची माहिती घेतो, मेंदूमध्ये त्या माहितीचा अर्थ लावतो, आणि आपल्या दृष्टीने योग्य तो प्रतिसाद देतो. योग्य प्रतिसाद काय हे आपण स्वतः, आपले कुटुंबीय, आणि समाजाच्या सामुदायिक अनुभवांमधून शिकतो. विषयामधील गुंतागुंत जसजशी वाढत जाते, तसे ते शिकण्यासाठी लागणारा वेळ वाढत जातो. लहानपणी अक्षरे शिकून आपले …